[aurangabad-maharashtra] - ‘जीएसटी’चा रस्त्याला खोडा

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दीडशे कोटी खर्चून शहरात होणारे रस्ते 'जीएसटी' कोण भरणार यावरून पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. याबाबत कंत्राटदार व पालिका प्रशासनातील चर्चा निष्पळ ठरली असून, सर्व प्रक्रिया होऊनही रस्ते कामाला मुर्हूत कधी लागणार हा प्रश्न कायम आहे.

शहरातील रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाने शंभर कोटी रुपयांचे विशेष अनुदान दिले. त्यात पन्नास कोटी डिफर्ड पेमेंटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दीडशे कोटी रुपये किमतीचे रस्ते शहरात केले जाणार आहेत. या कामाचा शुभारंभ होण्यास अडचणी सुरू असतानाच 'जीएसटी'वरूनही रस्ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. कंत्राटदारांनी 'जीएसटी' भरण्यास असमर्थता दर्शविली आहे. कंत्राटदारांना बँक गॅरंटी, सेक्युरिटी डिपॉझिट, अनामत अशी एकूण कॉस्टच्या दहा टक्के यासह 'जीएसटी'चे अठरा टक्के असे एकूण २८ टक्के रक्कम काम सुरू करण्यापूर्वी जमा करायचे आहेत. एवढे पैसे कसे भरायचे, असा प्रश्न कंत्राटदारांनी उपस्थित केला. त्याबाबत आयुक्तांसोबत दोन बैठकाही झाल्या. मात्र, त्यात कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे हे पैसे कोण भरणार असा प्रश्न कायम आहे. पालिकेने कंत्राटदारांना वर्क ऑर्डर दिली, कामाचा शुभारंभ ठरतो आहे. मात्र, जीएसटीवरून वाद सुरू झाला आहे. सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उडालेल्या या गोंधळामुळे पुन्हा रस्ते संकटात सापडले आहे. रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाने शंभर कोटी रुपये २७ जून २०१७ ला दिले. रस्त्यांसाठी विशेष अनुदान मंजूर करून दीड वर्ष उलटल्यानंतर पालिका प्रशासनाला रस्त्याचे काम सुरू करण्यास यश आले नाही. अंदाजपत्रक, निविदा, फेरनिविदा अशा वेगवेगळ्या प्रक्रियेत प्रशासकीय कामाचा गोंधळ पुढे आला. त्यानंतर प्रत्यक्ष कामाच्या शुभारंभावरूनही पक्षांची कुरघोडी पहायला मिळाली. त्यात आता 'जीएसटी' भरण्यावरून गोंधळ समोर आला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Im8MCAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬