[aurangabad-maharashtra] - मृत पोलिसाच्या पत्नीला विम्याचा धनादेश सुपूर्त

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहर पोलिस दलात कार्यरत असलेले जमादार अनिल भगवानराव शिंदे यांचा सहा जून २०१८ रोजी अपघातात मृत्यू झाला होता. अनिल शिंदे यांचे वेतन खाते अॅक्सिस बँकेत होते. बँकेने दिलेल्या सुविधेनुसार वेतन खाते असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा वैयक्तिक ३० लाखांचा नि:शुल्क अपघाती विमा काढण्यात आला होता. शिंदे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनिता शिंदे यांनी बँकेत संपर्क साधून शिंदे यांच्या अपघाती निधनाची माहिती कळवली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर बँकेने त्यांचा ३० लाखांचा क्लेम मंजूर केला. गुरुवारी एका कार्यक्रमात ३० लाखांचा धनादेश सुनिता शिंदे यांना सुपूर्त करण्यात आला. यावेळी अॅक्सिस बँकेचे विभागीय प्रमुख नितीन चालसे, शर्मा, मनोज कुलकर्णी, सुदर्शन कोलते यांच्यासह एपीआय घनश्याम सोनवणे, कर्मचारी अविनाश जोशी, सुनील पांडे, श्रीराम जवारे, सचिन नागरे, सुखानंद पगारे यांची उपस्थिती होती.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/e8j9mAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬