[aurangabad-maharashtra] - मराठवाडा साहित्य संमेलन रविवारपासून

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

४० वे मराठवाडा साहित्य संमेलन उदगीर (जि. लातूर) येथे २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. सीमावर्ती भागात ६६ वर्षानंतर होणारे संमेलन सांस्कृतिक आणि भाषिकदृष्ट्या मराठी भाषिकांना जोडणारे ठरणार आहे, अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठवाडा साहित्य परिषदेचे ४० वे मराठवाडा साहित्य संमेलन उदगीर येथे होणार आहे. राजीव गांधी तंत्रनिकेतन परिसरात संमेलन रंगणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे असून ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील उदघाटक आहेत. यावेळी मावळते अध्यक्ष रंगनाथ तिवारी, माहिती आयुक्त दिलीप धारुरकर, ज्येष्ठ कवी प्रा. फ. मुं. शिंदे, स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरुके, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव आदी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात दोन कविसंमेलनात १०० कवी सहभागी होणार आहेत. 'म्हणून मी लिहिते-लिहितो', 'आमची बोली सीमोल्लंघन', 'आजच्या दुष्काळाची दाहकता आणि प्रसारमाध्यमे', 'आजची सामाजिक अस्वस्थता आणि लेखकाची जबाबदारी', 'आजचे बिघडलेले सामाजिक चारित्र्य घडविण्यास संत साहित्यच उपयुक्त ठरू शकते' आणि 'मराठी कादंबरी वाचकांना पुरेसे उन्नत करीत नाही' या सहा विषयांवर परिसंवाद होणार आहे. कथाकथन, ग. पि. मनूरकर यांची प्रकट मुलाखत कार्यक्रम होणार आहेत. 'मराठवाड्याचे काव्यवैभव' हा प्रा. राजेश सरकटे यांचा कार्यक्रम, 'उदगीरचे कलावैभव' हा स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि अटलजींच्या कवितांचे वाचन कार्यक्रम होणार आहेत. साहित्य संमेलनात बाबू बिरादार, प्रसाद कुमठेकर, ज्ञानेश महाराव, सरोज देशपांडे, अतुल देऊळगावकर, प्रवीण बांदेकर, महेंद्र कदम आदी ख्यातनाम साहित्यिक सहभागी होणार आहेत. कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत समारोप होईल. या पत्रकार परिषदेला मसापचे कार्यवाह डॉ. दादा गोरे व कुंडलिक अतकरे उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pb7_nwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬