[aurangabad-maharashtra] - महावितरणच्या मोबाइल अ‍ॅपला ग्राहकांच्या पसंती

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यभरातील वीजग्राहकांसाठी महावितरणने उपलब्ध केलेला मोबाइल अ‍ॅप तब्बल ३४ लाख ग्राहकांनी डाउनलोड केला आहे. या अ‍ॅपद्वारे वीजबिल भरण्यासह अन्य सेवाही ऑनलाइन उपलब्ध असल्याने ग्राहकांसाठी हा उपक्रम लाभदायक ठरला आहे.

वीजग्राहकांना विविध सेवा ऑनलाइन, विशेषतः मोबाइलवर उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या संकल्पनेतून अडीच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले हे ॲप आजपर्यंत ३४ लाख ग्राहकांनी डाउनलोड करूत त्याचा वापर सुरू केला आहे. अँड्रॉइड, विंडोज, आयओएस आदी ऑपरेटिंग सिस्टिमवर हे अ‍ॅप उपलब्ध आहे. महावितरण कंपनीच्या www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाइटवरूनही अॅप डाउनलोड करता येते.

या अ‍ॅपमध्ये ग्राहक आपल्या वीजबिलाचा तपशील पाहू शकतात आणि ते नेट बँकिंग, डेबिट वा क्रेडिट कार्ड, कॅश कार्ड, मोबाइल वॉलेटद्वारे भरू शकतात. ग्राहकाला आलेल्या मागील सहा बिलांचा; तसेच बिल भरल्याचा तपशील पाहण्याची सुविधाही ॲपमध्ये आहे. महावितरणकडे काही कारणास्तव मीटर रीडिंग उपलब्ध झाली नाही, तर त्याबाबतची सूचना ग्राहकांना 'एसएमएस'द्वारे कळवण्यात येते. 'एसएमएस' प्राप्त झाल्यावर ग्राहक या अ‍ॅपद्वारे मीटर रीडिंग व फोटो पाठवू शकतात. या अ‍ॅपमधून ग्राहकांना नवीन वीज जोडणीसाठीही अर्ज करता येतो. जोडणीच्या अर्जाची सद्य:स्थितीही ग्राहकाला या अ‍ॅपद्वारे जाणून घेता येते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/3CrNnwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬