[aurangabad-maharashtra] - शेळके, मुलाटे, धर्मापुरीकर यांना पुरस्कार

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य शासनाचे स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले. पुरस्कारप्राप्त साहित्यिकात डॉ. वासुदेव मुलाटे, मधुकर धर्मापुरीकर, अॅड. डी. आर. शेळके, अॅड. निशा शिवूरकर, प्रशांत दळवी, प्रा. यशपाल भिंगे यांचा समावेश आहे.

उत्कृष्ट मराठी वाड्मय निर्मितीसाठीचे २०१७ या वर्षीचे स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार गुरुवारी जाहीर करण्यात आले. वेगवेगळ्या गटात ३२ लेखकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. रोख एक लाख रुपये, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. लघुकथा गटात मधुकर धर्मापुरीकर यांना 'झाली लिहून कथा' या कथासंग्रहासाठी दिवाकर कृष्ण पुरस्कार जाहीर झाला आहे. आत्मचरित्र गटात डॉ. वासुदेव मुलाटे यांना 'झाकोळलेल्या वाटा' ग्रंथासाठी लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, संकीर्ण गटात अॅड. डी. आर. शेळके यांना 'समाजपरिवर्तनाच्या दिशेने' पुस्तकासाठी भाई माधवराव बागल पुरस्कार जाहीर झाला. वाड्मयीन संशोधन गटात प्रा. यशपाल भिंगे यांना 'प्रत्ययाप्रति' ग्रंथासाठी श्री. के. क्षीरसागर पुरस्कार, 'लढा टाकलेल्या स्त्रियांचा' पुस्तकासाठी अॅड. निशा शिवूरकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आणि 'असा आहे श्याम' पुस्तकासाठी प्रशांत दळवी यांना भा. रा. भागवत पुरस्कार जाहीर झाला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/cqHMnQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬