[kolhapur] - अवतरणार अकरा लोकदैवते

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्रातील अकरा लोकदैवते, त्रिमूर्ती दत्ताची ३३ फुटी आणि पंढरीचा विठ्ठल आणि साईबाबा यांच्या २४ फुटी मूर्ती हे यंदाच्या नवउर्जा उत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. या उत्सवाच्या माध्यमातून निर्माण चौक येथील मैदानावर उभारलेल्या भव्य मंडपात लोकदैवतांचे दर्शन होणार असून शुक्रवार ता.२१ पासून नागरिकांना हा उत्सव पाहण्यासाठी खुला होत असल्याची माहिती प्रसिध्द कलादिग्दर्शक नितीन देसाई आणि भालचंद्र चिकोडे स्मृती मोफत वाचनालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. पुढील वर्षीच्या महोत्सवात देशभरातील देवस्थाने आणि २०२०च्या महोत्सवात जगभरातील प्रसिद्ध देवस्थानांच्या प्रतिकृतीचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ वाजून ४८ मिनिटाला उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पालकमंत्री पाटील यांच्या प्रेरणेतून २१ ते ३१ डिसेंबरदरम्यान उत्सवाचे आयोजन केले आहे. उत्सवाविषयी बोलताना देसाई म्हणाले, 'या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकदैवते समजल्या जाणाऱ्या विठोबा, खंडोबा, भैरोबा, जोतिबा, वेतोबा, एकवीरा, योगेश्वरी, रेणुका, यल्लम्मा, सप्तश्रृंगी आणि यमाई अशा ११ देवतांचे दर्शन घडेल. इकोफ्रेंडली मंडप, नेत्रदीपक सजावट, सोबत देवताची माहिती दर्शविणारे फलक अशी रचना केली आहे. मंडपाच्या दर्शनी भागात त्रिमूर्ती दत्त, साईबाबा आणि पंढरीच्या विठ्ठलाच्या मूर्ती उभारल्या आहेत. दत्तात्रयांची ३३ फुटी उंचीची ही एकमेव उंच मूर्ती असल्याचा दावा कलादिग्दर्शक देसाई यांनी केला. गेल्या दीड महिन्यापासून मूर्तीकाम सुरू होते. '...

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/4ZPMFwAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬