[kolhapur] - मेकर ग्रुप संचालकांच्या मालमत्तेवर टाच

  |   Kolhapurnews

मटा फॉलोअप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर परिसरातील ठेवीदारांना ५६ कोटीला गंडा घालणाऱ्या पुण्यातील मेकर ग्रुप इंडिया या कंपनीच्या १८ संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. पाच वर्षांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून या कंपनीने ४५ हजार ठेवीदारांची फसवणूक केली आहे. हे प्रकरण 'महाराष्ट्र टाइम्स'ने उघडकीस आणल्यानंतर सर्व संचालकांवर फौजदारी दाखल झाली. त्यामुळे लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

रमेश वळसे पाटील हे कंपनीचे संस्थापक आहेत. ते चेअरमन असलेल्या या कंपनीचे मनोहर अंबुलकर, ज्ञानदेव कुरूंदवाडे, पुरूषोत्तम हसबनीस यांच्यासह १८ संचालक आहेत. कंपनीची कोल्हापुरात शाखा सुरू करून अनेक ठेवीदारांना गंडा घातला. त्यासाठी जादा व्याजाचे आमिष दाखवले. पंधरा हजारावर एजंटांच्या माध्यमातून ४५ हजार ठेवीदारांकडून शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम घेतली. त्यातील काही रक्कम परत केली. पण, नंतर कंपनीचे कार्यालय बंद करून पोबारा केला. यामुळे ठेवीदार आणि एजंटांनी रक्कम मिळावी म्हणून पोलिसांत धाव घेतली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pZI9LgAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬