[kolhapur] - माथाडी कामगार मजूरी वाढीवर तोडगा नाहीच

  |   Kolhapurnews

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

जे ट्रान्स्पोर्टधारक लवादाने जाहीर केलेली २४ रुपयांची वाढ देतील, त्या ठिकाणीच काम सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी थोरात चौकात झालेल्या माथाडी कामगारांच्या बैठकीत घेण्यात आला. तर लवादाच्या मजुरीवाढीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालय जो निर्णय देईल, त्याच्याशी बांधिल राहण्याचा पवित्रा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे मजुरीवाढीचा गुंता कायम आहे.

गेल्या ११ दिवसांपासून माथाडी कामगारांनी मजूरीवाढप्रश्नी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनामुळे वस्त्रोद्योगातील सर्वच घटक अडचणीत सापडले आहेत. याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी गुरुवारी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या उपस्थितीत माथाडी कामगार प्रतिनिधींची बैठक घेतली. कामगार प्रतिनिधींनी लवादाच्या निर्णयाप्रमाणे फरकाची रक्कम द्यावी अन्यथा त्यांच्या विरोधात कायद्यानुसार जप्तीची कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर कामगारांनी पूर्ववत काम सुरू करावे. कामगारांची ट्रान्स्पोर्ट चालकांकडून पगाराच्या फरकाची देय रक्कम कायद्याने वसुल करून दिली जाईल, असे आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी दिले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/YPxTfgAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬