[kolhapur] - हातकणंगलेच्या सभापतीपदी जनसुराज्यच्या सरिता मोहिते

  |   Kolhapurnews

हातकणंगलेच्या सभापतीपदी जनसुराज्यच्या सरिता मोहिते

हातकणंगले : हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी जनसुराज्य पक्षाच्या सरिता हंबीरराव मोहीते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सुधाकर भोसले यांनी काम पाहिले. निकालानंतर मोहिते समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करत गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केला. मावळत्या सभापती रेश्मा सनदी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सभापती पदासाठी गुरुवारी निवडणूक झाली. सकाळी अकरा वाजता भाजप-जनसुराज्यचे अकरा, शिवसेनेचे दोन, महाडिक गटाचा एक असे चौदा सदस्य माजी आमदार राजीव आवळे यांच्यासोबत सभागृहात आले. विरोधी आवाडे गटाचे पाच, शेतकरी संघटनेचे तीन असे आठ सदस्य सभागृहात होते. त्यांनी अर्जच दाखल केला नाही. माजी आमदार राजीव आवळे, माजी जि. प. सदस्य राजवर्धन माहीते, जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, मावळत्या सभापती रेश्मा सनदी, हर्षद पाटील, प्रकाश गावडे उपस्थित होते.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/k7FoqAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬