[mumbai] - छे! पाणीटंचाई नाहीच...

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

पाणीकपातीमुळे मुंबईच्या विविध विभागात तीव्र पाणीटंचाई भासत असताना महापालिकेने मात्र हात वर केले आहेत. माटुंगा, सायन, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, दहीसर, कुलाबा, कफ परेड या भागात पाणीटंचाईवर सर्व उपाययोजना करण्यात आल्याने या भागात पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. प्रशासनाच्या या उत्तरावर नगरसेवकांनी संताप व्यक्त केला असून पाणीटंचाई असतानाही पालिका लपवाछपवी करत असल्याचा हल्ला चढवला आहे.

यंदा पाऊस कमी झाल्याने पालिकेने वर्षभरासाठी दहा टक्के पाणीकपात केली आहे. परिणामी मुंबईच्या अनेक भागात पाण्याला दाब नसल्याने पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, तसेच अनेक भागात अपुरे पाणी मिळत असल्याची नगरसेवकांची तक्रार आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा, कमलेश यादव, अभिजित सामंत, मंगेश सातमकर, विद्यार्थी सिंग, मकरंद नार्वेकर, राजूल पटेल, राजेश्री शिरवाडकर, आसिफ झकेरिया, राखी जाधव, संजय घाडी, विशाखा राऊत, रईस शेख यांनी यावर स्थायी समिती व पालिका सभागृहात वारंवार आवाज उठवल्यानंतर पालिकेने लेखी उत्तर दिले आहे. या उत्तरात बहुसंख्य विभागात पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे....

फोटो - http://v.duta.us/4eQESgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/woiq3gAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬