[mumbai] - बेवारस वाहने हटविण्यासाठी ‘ऑपरेशन खटारा’

  |   Mumbainews

मुंबईकरांना सहभागी होण्याचे आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबईच्या रस्त्याकडेला धूळ खात पडून असलेली शेकडो बेवारस वाहने हे मुंबईतील वाहतूक कोंडीचे एक प्रमुख कारण असून यामुळे मुंबईकरांची डोकेदुखी वाढली आहे. वर्षानुवर्षे पडलेल्या या वाहनांकडे पोलिस, पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 'मुंबई मिरर'ने ऑपरेशन खटारा हाती घेतले असून चार महिन्यांच्या यशस्वी प्रतिसादानंतर वृत्तपत्रासह विविध माध्यमांतून या समस्येला वाचा फोडण्यासाठी दुसऱ्या टप्पातील मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये मुंबईकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईला सध्या वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. विकासकामांसह ठिकठिकाणी रस्त्याच्या बाजूला अनेक वर्षांपासून पार्क करून ठेवण्यात आलेली वाहनेही या कोंडीमागील एक कारण आहे. या वाहनांमुळे वाहतूक कोंडी तर होतेच पण त्याचबरोबर मुंबईकरांना पार्किंगसाठी जागा कमी पडते. अनेक वाहने गुन्ह्यात वापरली असण्याची शक्यता आहे.या वाहनांच्या आडून घातपाती कारवायांचाही धोका आहे. या गाड्या वर्षानुवर्षे ऊन पावसात एकाच ठिकाणी उभ्या असल्याने डासांची पैदास होते. यामुळे रोगराई पसरते. यावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि या गाड्या हटविण्यासाठी 'मुंबई मिरर'ने सलग चार महिने ऑपरेशन खटारा ही मोहीम चालवली. अनेक मुंबईकरांनी बेवारस वाहनांचे फोटो तसेच माहिती पाठवली. त्यावर सविस्तर माहिती काढून त्यांना प्रसिद्धी देण्यात आली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/VqZ17wAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬