[mumbai] - मध्य रेल्वेवर पुन्हा तांत्रिक बिघाड

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मध्य रेल्वेच्या करीरोड स्थानकाजवळ गुरुवारी दुपारी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवल्याने प्रवाशांना पुन्हा एकदा ढिसाळ कारभाराचा त्रास सहन करावा लागला.

स्थानकावरील डाउन धीम्या मार्गावर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. दुपारी ही घटना घडल्यामुळे स्थानकांवर तुरळक गर्दी होती. मात्र या बिघाडामुळे लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत असल्याने प्रवासी चांगलेच संतापले होते.

'तांत्रिक कारणांमुळे लोकल उशिरा अपेक्षित आहे', अशी उद्घोषणा स्थानकात करण्यात आल्याने प्रवाशांनी रस्ते मार्गानी प्रवास करण्याला पसंती दिली. अखेर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लोकलमधील बिघाड दुरुस्त करून ती मार्गस्थ झाल्यामुळे अन्य लोकलसाठी मार्ग खुला झाला. तथापि सलग दुसऱ्या दिवशी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/blGs4QAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬