[mumbai] - राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा……

  |   Mumbainews

यंत्रसामग्रीसाठी वापरलेल्या स्व-निधीवरही भांडवली अनुदान

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणाचा लाभ अधिकाधिक घटकांना व्हावा, यासाठी त्यामध्ये काही सुधारणा करण्यास राज्‍य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या सुधारणांमुळे बँक अर्थसहाय्यित प्रकल्पांनी यंत्रसामग्री खरेदीसाठी वापरलेल्या स्व-निधीवरही भांडवली अनुदान मिळणे शक्य होणार आहे.

याच वर्षी फेब्रुवारीमध्ये राज्य सरकारने पुढील पाच वर्षांसाठी वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले होते. गुरुवारी केलेल्या सुधारणांमुळे वस्त्रोद्योग घटकांना पूर्वीच्या किंवा नवीन वस्त्रोद्योग धोरणातील योजनांच्या लाभाचा पर्याय देणे, अतिरिक्त अनुदान, स्वनिधीवर भांडवली अनुदान आदी फायदे देता येणार आहेत. त्यानुसार १ ऑगस्ट २०१७ ते १४ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत दीर्घ मुदत कर्ज मंजूर झालेल्या प्रकल्पांसह यंत्रसामग्रीच्या खरेदीचे आदेश दिलेल्या स्व-अर्थसहाय्यित प्रकल्पांना वस्त्रोद्योग धोरण २०११-१७ किंवा २०१८-२३ मधील योजनांचा लाभ घेण्याचा पर्याय आहे. नवीन धोरणामधील कंपोझीट युनिटची व्याख्या, भांडवली अनुदान आणि विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील प्रकल्पांना कंपोझीट युनिटसाठी अतिरिक्त अनुदान यासंबंधीच्या तरतुदी वगळण्यात आल्या आहेत. त्याऐवजी राज्यातील सर्व विभागांतील प्रकल्पांना पुढील व मागील प्रक्रिया प्रकल्प स्थापन केल्यास पाच टक्के अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ZK-5IQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬