[mumbai] - शिक्षणाचा विकास आराखडा तयार होणार

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

काळानुरूप शिक्षणात काय बदल होणे अपेक्षित आहेत, भविष्यातील संधींचा विचार करून विद्यार्थ्यांना आता कोणते शिक्षण देणे अपेक्षित आहे, याचा सर्वंकष विचार करून राज्यातील शिक्षणाची दिशा ठरविण्याच्या उद्देशाने शिक्षणाचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. यात उच्च शिक्षणाची पुढील १० वर्षांची दिशा दाखविली जाणार आहे, असे प्रतिपादन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्स मुख्याध्यापक परिषदेत बोलताना केले.

शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्सतर्फे मुख्याध्यापक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तावडे यांनी शिक्षणात सातत्यपूर्ण बदल आवश्यक असल्याचे सांगत मुख्याध्यापकांशी मोकळा संवाद साधला. याच दृष्टीने हा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. शिक्षण, उद्योग, कौशल्य विभाग असे विविध सरकारी विभाग एकत्र विचारमंथन करून हा आराखडा तयार करणार आहेत, असे तावडे म्हणाले....

फोटो - http://v.duta.us/WsMDlAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/i9NCngAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬