[mumbai] - सिडको भूखंडाच्या भाडेपट्ट्यात वाढ

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

नवी मुंबई विभागातील सिडको महामंडळामार्फत रह‍िवासी व व्यावसायिक कामासाठी वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचा भाडेपट्टा कालावधी ९९ वर्षांसाठी वाढविताना एकरकमी हस्तांतरण शुल्क आकारून, त्या जमिनी 'फ्री होल्डसम' करण्यास राज्य सरकारने मान्यता द‍िली आहे. सरकारच्या या निर्णयाची स‍िडकोने त्वरित अंमलबजावणी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द‍िले असून नाश‍िक आण‍ि औरंगाबाद येथेही स‍िडकोमार्फत वाटप भूखंडांबाबत ही कार्यपद्धती अवलंबण्यात येणार आहे.

नवी मुंबई येथे राज्य सरकारने संपादित केलेल्या जमिनींचा विकास करून अशा जमिनी सिडकोमार्फत भाडेपट्ट्याने वाटप करण्यात येत आहेत. अशा भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या जमिनींचा भाडेपट्टा कालावधी वाढविण्याबाबत सिडको संचालक मंडळाने ठराव पार‍ित करून सरकारच्या मान्यतेसाठी सादर केला होता. त्यास अनुसरून सरकारने गुरुवारी निर्णय जाहीर केला असून त्यामध्ये एकरकमी हस्तांतरण शुल्क आकारणी निश्चित करण्यात आली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Vm4PeQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬