[mumbai] - हमीदचे स्वागत आनंदाश्रूंनी!

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

दिल्लीमध्ये जल्लोषात स्वागत झाल्यानंतर हमीद अन्सारीचे मुंबईतही तितक्याच आनंदाने स्वागत झाले. आपल्या घराच्या उबदार वातावरणात परतल्याची जाणीव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होती. आप्तांना, मित्रांना सहा वर्षांनी भेटल्याचा आनंद हमीदच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या डोळ्यांमधून वाहत होता. गुरुवारी सकाळी तो दिल्लीहून मुंबईमध्ये परतला.

हमीदला २०१२मध्ये पाकिस्तानात अवैध मार्गाने प्रवेश केल्याबद्दल अटक झाली होती. त्याच्यावर हेरगिरीचा आरोप होता. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने हमीदला कायदेशीर मदत मिळावी यासाठी ९६ नोटिसा पाठवल्या होत्या. हमीद घरी परतावा यासाठी कुटुंबीय आणि शुभचिंतकांनी केलेल्या सगळ्या प्रार्थना फळाला आल्याची भावना त्याची आई, फौजिया अन्सारी यांनी व्यक्त केली तर अन्सारी कुटुंबासाठी एक नवी पहाट उजाडल्याचे त्याचे वडील निहाल अन्सारी यांनी सांगितले. त्याचा शिक्षेचा कालावधी १५ डिसेंबर रोजी संपला होता मात्र त्याचे कायदेशीर कागदपत्ो तयार नसल्याने त्याला भारतामध्ये लगेच परतता आले नाही. त्यामुळे तो प्रत्येक क्षण त्याच्या कुटुंबीयांसाठी कठीण होता....

फोटो - http://v.duta.us/2Xu10QAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1EgM7wAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬