[nagpur] - आता ‘सुपर’ ठरले हृदयरोगींसाठी जीवनदायी

  |   Nagpurnews

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या दारिद्र्यरेषेखालील रुग्णांसाठी मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी रुग्णालय जीवनदायी ठरत आहे. सरकारी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण करणारे 'सुपर' राज्यातील एकमेव रुग्णालय ठरले आहे. यातून आतापर्यंत 'सुपर'ने ३८ किडनी प्रत्यारोपणाच्या शल्यक्रिया यशस्वी केल्या आहेत. किडनी पाठोपाठ आता हे रुग्णालय हृदयरोगींसाठी उमेदीचा किरण देणारे ठरत आहे.

रुग्णालयाने अवघ्या सहा दिवसांत हृदयाचा गंभीर आजार घेऊन आलेल्या तिघांना मृत्यूच्या दाढेतून खेचून आणण्यात यश मिळविला आहे. विशेष म्हणजे हे तिघेही अवघ्या तिशीतील उमदे तरुण आहेत. त्यांच्या हृदयातली रक्ताभिसरण प्रक्रियाच थांबली होती. श्वास थांबला होता, परंतु तीन तासांच्या आता सुपरच्या हृदय विभागाने या तिघांनाही मृत्यूच्या मिठीतून सोडविले आहे. या पैकी दोघे सध्या सुपरच्या हृदयरोग विभागात डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत आहेत. हृदयविभागाचे प्रमुख डॉ. मुकुंद देशपांडे, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील वाशीमकर, डॉ. प्रदीप देशमुख यांनी या तिनही युवकांवर तीन तासांत एन्जिओप्लास्टी केली आणि त्यांना नवजीवन दिले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/qmMlOQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬