[nagpur] - तोतया एसएनडीएल अधिकाऱ्यासह दोघे गजाआड

  |   Nagpurnews

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

बोगस मीटर लावून फसवणूक करणाऱ्या तोतया एसएनडीएल अधिकाऱ्यासह दोघांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनने मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून मीटरसाठी लागणारे दस्तऐवज व मीटर जप्त केले. नीलेश रमेश नंदनवार (वय ३०,रा. नाईक तलाव) व भास्कर गजानन निमजे (वय ६८,रा. तांडापेठ) ,अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

नीलेश हा स्वत:ला एसएनडीएलचा अधिकारी असल्याचे सांगत होता. २२ ऑक्टोबरला एसएनडीएलच्या पथकाने तांडापेठ भागात तपासणी केली. भास्कर याच्याकडील मीटरची चौकशी केली असता ते नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आल्याचे समोर आले. नीलेशने मीटर लावून दिल्याचे भास्करने पथकाला सांगितले. नीलेशला चौकशीसाठी बोलाविले असता तो पसार झाला. एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांनी पोलिस उपायुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेत प्रकरणाची कसून चौकशी करण्याची विनंती केली. उपाध्याय यांनी पोलिस उपायुक्त संभाजी कदम व सहायक पोलिस आयुक्त संजीव कांबळे यांना चौकशीचे आदेश दिले. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक माधव शिंदे, मंगला मोकाशे, हेडकॉन्स्टेबल रफीक खान, शैलेश पाटील, विठ्ठल नासरे, रामचंद्र कारेमोरे, अरुण धर्मे, दयाशंकर बिसांद्रे, राकेश यादव, विकास पाठक व हरीश बावने यांनी तपास करून दोघांना अटक केली. चौकशीदरम्यान नीलेशने १६ घरांमध्ये नियमबाह्यपणे मीटर लावल्याचे समोर आले. दोघेही २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/VabTbgAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬