[nagpur] - बलात्काराचा गुन्हा दाखल होताच प्रियकराची आत्महत्या

  |   Nagpurnews

म.टा. वृत्तसेवा, यवतमाळ

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याची तक्रार प्रेयसीने दिल्याने महागाव पोलिसांनी प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करीत त्याचा शोध सुरू केला. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच हादरलेल्या प्रियकराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना महागाव तालुक्यातील धारेगाव येथे बुधवारी रात्री घडली. ज्ञानेश्वर रामराव खंदारे (वय २५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पोलिसांनी चौघांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.

धारेगाव येथील ज्ञानेश्वरचे गावातील अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी दोन्ही कुटुंबीयांची बैठकही झाली. मुलीचे वय कमी असल्याने विवाहयोग्य वय झाल्यानंतर त्यांचे लग्न लावून देण्यास ज्ञानेश्वराच्या वडिलांनी तयारी दार्शविली. मात्र, मुलीकडील मंडळी लवकरात लवकर लग्न करावे, यासाठी दबाव टाकू लागले तसेच मुलाकडील मंडळी वयाचे कारण देऊन लग्नासाठी टाळाटाळ करीत असल्याचा त्यांचा समज झाला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/qLqY9QAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬