[nagpur] - बोलीभाषा हीच मराठीची खरी ताकद

  |   Nagpurnews

म.टा. वृत्तसेवा, अकोला

'बोलण्यात किंवा लिखाणात बोलीभाषेचे शब्द वापरले की भाषेची शक्ती वाढते. इंग्रजीसारखी गब्बर भाषादेखील भारतीय भाषांतील दरवर्षी शंभर तरी शब्द स्वीकारते. मग आमच्या मराठीने बोलीचे शब्द का बरं घेऊ नयेत? एखाद्या ठिकाणची बोली मेली तर फक्त बोली मरत नाही, तर त्या प्रदेशाचा भूगोल मरतो, संस्कृती मरते. बोली गेली की सगळे संपते. केवळ बोली चळवळीमुळे भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली हा झाडीप्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर लोककला संवर्धनावर भर देणे गरजेचे आहे', असे प्रतिपादन पहिल्या वऱ्हाड लोककला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई आणि वऱ्हाड शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी अकोल्यात पहिल्या वऱ्हाड लोककला साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन डॉ. रमेश सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांची उपस्थिती होती. श्री शिवाजी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात हे संमेलन होत आहे. ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ, नीलेश वडतकर, डॉ. प्रवीण वाघमारे, डॉ. रावसाहेब काळे आदींच्या पुढाकाराने आयोजित या संमेलनाचे आयोजन कर्मयोगी गाडगेबाबांच्या पुण्यतिथीच्या औचित्य साधून करण्यात आले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/OlogWgAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬