[nagpur] - मा. गो. वैद्य यांना अटल जीवनगौरव

  |   Nagpurnews

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात आलेल्या अटल सन्मानातील पहिला अटल जीवनगौरव पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांना प्रदान करण्यात आला.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सुरेश भट सभागृहात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर प्रमुख पाहुणे होते.

कला क्षेत्रात लाखनी येथील डॉ. हरिश्चंद्र बोरकर, संगीत क्षेत्रासाठी व्हायोलिनवादक 'सूरमणी' पं. प्रभाकर धाकडे, शिक्षणक्षेत्रात मुबारक सय्यद (खराशी, भंडारा), महिला सक्षमीकरणासाठी संगीता सव्वालाखे (यवतमाळ), प्रेरणा सन्मान-भाऊ काणे, प्रगतिशील शेतकरी-अनंता वाघ (अकोला), समाजसेवा- सुचिता सोळंके (कारंजा, वाशीम), कृषी- गणराज पाटील (मेळघाट), जलसंधारण- माधव कोटस्थाने आणि पर्यावरण- गोपाळराव ठोसर यांना अटल सन्मानने गौरवण्यात आले....

फोटो - http://v.duta.us/TVqSAQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/zhyo5wAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬