[nagpur] - साप शिरलेल्या जागी सेलोटेप लावून एक्स्प्रेस रवाना

  |   Nagpurnews

नागपूर:

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी संध्याकाळी साप शिरल्यानं गोंधळ उडाला. सर्पमित्राच्या मदतीनं नागपूर रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांनी साप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यात अपयश आलं. अखेर साप शिरलेल्या जागी सेलोटेप लावून एक्स्प्रेस गोंदियाकडे रवाना केली.

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ‌वर्धा आणि नागपूरदरम्यान असताना, प्रवासी शंकर लोपेंटी याला सर्वसाधारण डब्यामधील सज्जावर ठेवलेल्या बॅगजवळ साप दिसला. त्यामुळं तो घाबरला आणि आरडाओरडा सुरू केला. त्याचा आरडाओरडा ऐकून इतर प्रवासीही घाबरले. सर्व प्रवाशांनी कंपार्टमेंट रिकामा केला. जीव मुठीत धरून सर्वांनी नागपूरपर्यंत प्रवास केला. काही वेळात एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक चारवर पोहोचली. एक्स्प्रेसमध्ये साप शिरल्याची माहिती मिळताच, रेल्वेस्थानकाचे व्यवस्थापक दिनेश नागदेवे, उपव्यवस्थापक राजू इंगळे, प्रवासी सुविधा पर्यवेक्षक प्रवीण रोकडे, वरिष्ठ अभियंते अभिषेक सांगा, हेल्पर बाबुलाल, विकास रामेकर फलाटावर पोहोचले. सर्पमित्र आकाश पवार यांनाही बोलावलं. त्यांनी एक्स्प्रेसमधील सापाचा शोध घेतला. परंतु, तो बर्थच्या बाजूला असलेल्या प्लायवूडच्या आतील भागात घुसला. प्रयत्न करूनही सापाला बाहेर काढता आलं नाही. अखेर साप शिरलेल्या जागेवर सेलोटेप लावून एक्स्प्रेस गोंदियाकडे रवाना करण्यात आली.

फोटो - http://v.duta.us/GWDV8gAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/EBdueAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬