[nashik] - अजंग एमआयडीसीचेफेब्रुवारीत भूमिपूजन

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील अजंग-रावळगाव येथील तिसऱ्या टप्प्यातील औद्योगिक वसाहतीच्या ८२३ एकर जमिनींच्या ले-आउटला उद्योग विभागाची मान्यता प्राप्त झाली असून, या वसाहतीचे फेब्रुवारी २०१९ मध्ये भूमिपूजन होणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत भुसे यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमहापौर सखाराम घोडके उपस्थित होते. अजंग रावळगाव येथे होणाऱ्या औद्योगिक वसाहतीसंदर्भात बुधवारी मुंबई येथे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस दादा भुसे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा, अण्णासाहेब मिसाळ, कैलास जाधव, प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील आदींसह मालेगाव येथील व्यापारी व उद्योजक उपस्थित होते.

बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अजंग रावळगाव एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करून मंजूर ले-आउटनुसार सदर भूखंडावर मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज व इतर कामे व्हावीत याचे अंदाजपत्रक १५ दिवसात तयार करून निविदा मागविण्याची प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करण्यात यावी, असे आदेश देसाई यांनी बैठकी दरम्यान दिल्याचे भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. फेब्रुवारीत भूखंड मागणी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. यात समांतर भूखंड वाटप प्रक्रिया राबविण्यात येणार असून स्थानिकांबरोबर महिला, अपंग, बचतगट, शेतकरी, अनु.जाती/जमाती साठी विशेष प्रोत्साहन योजनेंतर्गत मागासवर्गीय उद्योजकांना काही भाग राखीव ठेवण्यात यावे, अशी सूचना या बैठकीत केली असल्याचे भुसे यांनी सांगितले. तसेच मालेगाव येथील प्रस्तावित उद्योग उभारणी बाबत राज्य व स्थानिक पातळीवरील उद्योजकांशी फेब्रुवारीत बैठक घेण्यास देसाई यांनी मान्यता दिली आहे. जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या दोन्ही विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक आठवड्यातून एक दिवस मालेगावी येणार असल्याचे देखील भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले...

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/eJG3gwEA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬