[nashik] - एमआयडीसीला पालिकेचा दणका

  |   Nashiknews

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात हायकोर्टाने खरडपट्टी काढल्यानंतर पालिकेच्या पर्यावरण विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) नोटीस बजावली आहे. रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. या दोन्ही वसाहतींतील ४० कारखाने प्रक्रिया न करताच नाल्यांमध्ये पाणी सोडत असल्याचे पर्यावरण विभागाने म्हटले आहे.

गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात हायकोर्टात सुना‌वणी सुरू असून, कोर्टाने प्रदूषण कमी करण्यासाठी वेळोवेळी अनेक उपाययोजना सुचवल्या आहेत. निरीच्या अहवालानुसार अनेक उपाय करण्याचे आदेश न्यायालयाने पालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळाला दिल्या आहेत. परंतु, त्यावर प्रगती झालेली दिसत नाही. प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याने दोन दिवसांपूर्वी हायकोर्टाने याबाबत सरकारी यंत्रणांवर ताशेरे ओढले होते. गोदावरीत मिसळणाऱ्या नाल्यांमधून प्रदूषणयुक्त पाण्याचा पाझर सुरू असल्याच्या तक्रारी असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. पालिकेने एकीकडे सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या मलजल शुद्धीकरण केंद्रांची क्षमताही वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली असताना खासगी उद्योगांकडे मात्र दुर्लक्ष केले होते. औद्योगिक वसाहतींतील कारखान्यांतील पाणी प्रक्रिया केल्यानंतरच बाहेर सोडावे, असे बंधन आहे. मात्र, अनेक कारखाने लगतच्या नैसर्गिक नाल्यात रसायनयुक्त पाणी सोडतात. या नाल्यांद्वारे हे पाणी थेट गोदावरीत मिसळते. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जवळपास ४० कारखान्यांकडून रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याचे समोर आले आहे. सोमेश्वर नाला, बारदान फाटा, नंदिनी, चिखली या नाल्यांत असे पाणी सोडले जात असल्याने त्यासाठी जबाबदार कारखान्यांवर तातडीने कारवाईचे आदेश या नोटिशीद्वारे पालिकेने एमआयडीसीला दिले आहेत. त्यामुळे एमआयडीसीला आता या कारखान्यांवर कारवाई करावी लागणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/K2sdzAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬