[nashik] - नाताळानिमित्त फुलली बाजारपेठ

  |   Nashiknews

बच्चेकंपनीत उत्साह; आकर्षक वस्तूंची खरेदी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केवळ तीन दिवसांवर नाताळ सण आल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरातील बाजारपेठ आकर्षक वस्तूंनी फुलली असल्याचे दिसून येत आहे. ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी पताका यांसह सांताक्लॉजचे कपडे आणि विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. यामध्ये बच्चेकंपनीचा उत्साह सर्वाधिक असून, चर्च आणि घर सजावटीच्या वस्तूंची मागणी वाढली आहे.

नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती बांधवांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मेनरोड, त्रिमूर्ती चौक, नाशिकरोड येथील बाजारपेठेत नाताळाच्या वस्तूंची आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. होली रीट, बेल्स, प्रभू येशू आणि मेरी यांच्या मूर्ती, सांताक्लॉजचे कपडे, चांदणी, खेळणी, सांताक्लॉजचा मुखवटा, ख्रिसमस बॉल्स, ट्री आणि टोप्या खरेदी करण्याची लगबग बाजारात दिसून येत आहे. तसेच नाताळाच्या शुभेच्छा देण्यासाठी ख्रिस्ती बांधवांकडून मिठाई, चॉकलेट आणि केक्सची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जात असून, नाताळासाठी खास केक विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे कॉन्व्हेंट शाळांमध्येही नाताळ सणाचे सेलिब्रेशन होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह असून, बच्चेकंपनीही बाजारात गर्दी करत आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/yTLe-gAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬