[nashik] - मोबाइल चोरीत अल्पवयीन मुलगा!

  |   Nashiknews

सुमारे सव्वा लाख रुपयांचे १८ हॅण्डसेट जप्त

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात भद्रकाली पोलिसांचा एका अल्पवयीन मुलांपर्यंत येऊन थांबला. या मुलाने दिलेल्या माहितीनुसार दोघा खरेदीदारांना पोलिसांनी अटक केली असून, चोरीचे दोन गुन्हे देखील उघडकीस आले आहेत. संशयित आरोपीच्या ताब्यातून एक लाख ३७ हजार रुपयांचे १८ मोबाइल हस्तगत करण्यात आले. संशयितांच्या अटकेने अनेक गुह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

बाजारपेठ असलेल्या मेनरोडसह जुन्या नाशकातील वर्दळीच्या भागात सतत मोबाइल चोरीचे प्रकार घडतात. नाशिक-पुणे मार्गावरील सिद्धार्थ हॉटेल पाठीमागे राहणाऱ्या शीतल प्रमोद नेवासकर यांचाही मोबाइल काही महिन्यांपूर्वी चोरीस गेला होता. मेनरोड भागात खरेदीसाठी आलेल्या नेवासकर यांच्या पाठीवर असलेल्या बॅगची चेन उघडून चोरट्यांनी दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला होता. या घटनेची दखल घेत भद्रकाली पोलिस चोरट्यांचा माग काढीत होते. या दरम्यान बागवानपुरा भागातील १७ वर्षांच्या अल्पवयीन युवकाबाबत पोलिसांना माहिती मिळाली. संशयावरून पोलिसांनी गत शुक्रवारी मुलाकडे चौकशी केली. यावेळी त्याने कबुली देत १८ मोबाइल चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/wDpxkQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬