[nashik] - महाराष्ट्राचा डबल धमाका

  |   Nashiknews

अजय कश्यप

भरत पुरस्कार

…अमृता जगताप

ईला पुरस्कार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे झालेल्या २९ व्या किशोर-किशोरी (१४ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अजिंक्यपद पटकावले. सबज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत दिला जाणारा किशोर गटातील भरत पुरस्कार सोलापूरच्या अजय कश्यपला, तर किशोरी गटातील इला पुरस्कार उस्मानाबादच्या अमृता जगतापने पटकावला.

किशोर गटातील अटीतटीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावातील दोन गुणांची पिछाडी भरून काढत अतिरिक्त डावात तेलंगणवर १७-१६ (५-७, ६-४, ६-५) अशी एका गुणाने मात करून अजिंक्यपद कायम राखले. तेलंगणने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्यातील दोन डावांनंतर दोन्ही संघ ११-११ अशा समानगुण स्थितीत होते. ही कोंडी फोडण्यासाठी अलाहिदा डाव खेळवण्यात आला व या डावातील महाराष्ट्राच्या संरक्षणाच्या पाळीत प्रतिस्पर्धी संघाला सामना बरोबरीत सोडवायला एका गुणाची आवश्यकता असताना अजय कश्यपने नाबाद १.४० मिनिट पळतीचा खेळ करीत विजयश्री खेचून आणली. महाराष्ट्राच्या विवेक ब्राह्मणे (१.२० मिनिट, १.२० मिनिट, १.४० मिनिट व १ गडी), सचिन पवार (नाबाद १.१० मिनिट व ४ गडी), रवी वसावे (१.१० मिनिट, १.३० मिनिट, १.३० मिनिट व ३ गडी) व किरण वसावे (२.५० मिनिट व २ गडी) यांचा विजयात सिंहाचा वाटा होता....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/bIORoAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬