[nashik] - सिडकोवासीय झाले ‘मालक’

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोने नाशिक शहरात उभारलेल्या सहा योजना लिज पद्धतीच्या असल्याने येथील रहिवाशांना विविध गोष्टींसाठी सिडको प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागत होता. हस्तांतरण करताना सरकारी मुद्रांक शुल्क व सिडकोची हस्तांतरण फी दोन्ही रकमांचा बोजा पडत होता. मात्र, आता सिडकोच्या सर्व मिळकती 'फ्री होल्ड' करण्यात आल्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याने, या घरांची मालकी 'मुक्त' झाली आहे.

याबाबत आमदार सीमा हिरे म्हणाल्या की, सिडको नागरिक संघर्ष समितीच्या माध्यमातून २०१४ पासून सिडकोच्या मिळकती 'फ्री होल्ड' करून मालकी हक्‍कांत लाभार्थीचे नाव लागावे, यासाठी मागणी करण्यात येत होती. या मिळकती लिजवर असल्याने कोणत्याही परवानगीसाठी किंवा हस्तांतरणासाठी रहिवाशांना सिडकोच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. मात्र, आता या मिळकती राज्य सरकारने मुक्त केल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिडको 'फ्री होल्ड' करण्यासाठी व रहिवाशांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांच्याकडेदेखील नागरिक संघर्ष समिती व गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह सप्टेंबर २०१७ मध्ये बैठक झाली होती. या बैठकीत सिडको 'फ्री होल्ड' करण्याच्या दृष्टीने तातडीने प्रस्ताव तयार करण्यात येईल, असे आश्वासन व्यवस्थापकीय संचालकांनी दिले होते. तसा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला. तो मंत्रालयात प्रलंबित होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावावर निर्णय घेऊन सिडकोच्या मिळकती 'फ्री होल्ड' करण्यात आल्याचे जाहीर केले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/vsYYlgAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬