[navi-mumbai] - अतिक्रमणाविरोधाततरुणाने जाळून घेतले

  |   Navi-Mumbainews

अनधिकृत बांधकामे न हटविल्याचा निषेध

म. टा. प्रतिनिधी, नगर

कर्जतमधील दावल मलिक ट्रस्टच्या जमिनीवर झालेली अनधिकृत बांधकामे प्रशासनाकडून हटविण्यात येत नसल्याने कर्जतमधील तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाळून घेतले. तौसिफ हासिम शेख (वय ३५, रा. कर्जत) असे त्याचे नाव आहे. शेखवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

कर्जतमध्ये दावल मलिक ट्रस्ट असून, त्याच्या जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. जमिनीवर कच्चे व पक्के बांधकाम केले आहे. ते अतिक्रमण हटविण्याची मागणी शेख व इतर नागरिकांनी प्रशासनाकडे केली होती. अतिक्रमणे न हटविल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेखने दिला होता. त्यानंतर हे बांधकाम काढण्याबाबत प्रांतधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यानंतर शेखने आत्मदहन स्थगित केले होते. मात्र, अतिक्रमणे हटविण्यात न आल्याने शेखने २० डिसेंबरला आत्मदहन करण्याबाबत निवेदन दिले होते. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेख मोटारसायकलवरून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. त्याने स्वतःच्या अंगावर ज्वालागृही पदार्थ टाकला. तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमध्ये आला आणि त्याने स्वतःला पेटवून घेतले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/q-JNtAAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬