[navi-mumbai] - मुंबई-पुणे रस्त्यावर दोन तास कोंडी

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

सायन-पनवेल मार्गावर नेरूळ येथील एलपी उड्डाणपुलावर गुरुवारी सकाळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रेलरची तीन गाड्यांना धडक लागून झालेल्या अपघातात गाडीमधील आठजण जखमी झाले. या अपघातानंतर हा ट्रेलर सायन-पनवेल मार्गावर दोन्ही मार्गिकेवर आडवा झाल्याने दोन्ही मार्गांवरील वाहतूक विस्कळित होऊन तासभर वाहतूककोंडी झाली होती. त्यानंतर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत सुरू झाली. मात्र, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना आणखी तासभर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. यावेळी तुर्भे वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. अपघातातील जखमींवर नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात तसेच महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर ट्रेलरचालक पळून गेला असून नेरूळ पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/IwpFzQAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬