[navi-mumbai] - राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

  |   Navi-Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

राज्य सरकारतर्फे गुरुवारी वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. समीक्षेसाठी प्रा. यशपाल भिंगे यांना श्री. के. क्षीरसागर पुरस्कार, धर्मधुरीण या साहित्यनिर्मितीसाठी डॉ. प्रकाश लोथे यांना सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार जाहीर झाला आहे.

आशुतोष पोतदार, डॉ. निशा शिवूरकर, डॉ. जयसिंगराव पवार, नरेश नाईक, डॉ. वर्षा गंगणे, सुरेश पाटोळे, डॉ. उमा वैद्य, नामदेव माळी, डी. आर. शेळके यांनाही राज्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रथम प्रकाशनासाठी अमृत तेलंग, रचना, अविनाश राजाराम, सुधीर महाबळ यांना गौरवण्यात येणार आहे. तर, बालवाङ्मयासाठी गौतम पाटील, प्रशांत दळवी, संगीता बर्वे, रमेश तांबे, डॉ. वैशाली देशमुख, प्रकाश गोपाळ यांच्या साहित्यकृतींना पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा प्रथम प्रकाशन नाटक, विनोदी साहित्य तसेच प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या श्रेणीमध्ये कोणाचीही शिफारस नसल्याने या तीनही श्रेणींमध्ये कोणालाही पुरस्कार जाहीर झालेला नाही.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/jo5YNgAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬