[navi-mumbai] - संगीतकार लक्ष्मीकांत यांना रफी जीवनगौरव पुरस्कार

  |   Navi-Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील दिवंगत संगीतकार लक्ष्मीकांत कुडाळकर यांना यंदाचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा तिमोथी यांना मोहम्मद रफी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आमदार अॅड. आशीष शेलार यांच्या 'स्पंदन' संस्थेतर्फे दरवर्षी रफी यांच्या वाढदिवशी हे पुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराचे हे अकरावे वर्ष असून एक लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि शाल-श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे, तर ५१ हजार रुपयांचा धनादेश आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे.

रफी यांनी लक्ष्मी-प्यारेंकडे सर्वाधिक गाणी गायली आहेत. तसेच, ही संगीतकार जोडी रफी यांच्या विशेष पसंतीची होती. यामुळे लक्ष्मीकांत यांना देण्यात येणारा पुरस्कार विशेष औचित्यपूर्ण ठरणार आहे. वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात २४ डिसेंबरला संध्याकाळी ६.३० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असून तो सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. यावेळी प्रसाद महाडकर यांच्या 'जीवनगाणी' संस्थेतर्फे 'फिर रफी' या बहारदार मैफलीत लोकप्रिय गायक श्रीकांत नारायण हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रवेशिका आमदार अॅड. आशीष शेलार यांच्या वांद्रे येथील कार्यालयात उपलब्ध आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/MvsgywAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬