[pune] - खंबाटकीच्या नवीन बोगद्याचे रविवारी भूमिपूजन

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंबाटकी येथील धोकादायक एस वळण टाळण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या नवीन बोगद्याच्या कामास आता प्रारंभ होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येत्या रविवारी (ता. २३) या कामाचे भूमिपूजन होणार आहे. हा बोगदा सहा लेनचा असणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हा बोगदा बांधण्यात येत आहे. हा कार्यक्रम सातारा येथे होणार असून या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या वेळी संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्गाच्या कामाचेही भूमिपूजन होणार आहे.

खंबाटकी घाटातील प्रस्तावित सहा लेनचा बोगदा हा दोन्ही बाजुच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे खंबाटकी घाट रस्ता आणि धोकादायक 'एस' वळण दोन्ही गोष्टी टाळून प्रवास करणे शक्य होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या बोगद्याच्या उजव्या बाजूस हा बोगदा होणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ehXi1gAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬