[pune] - पाच लाखांची घरफोडी

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बंद ऑफिसच्या स्लाइडिंगच्या खिडकीतून प्रवेश करून ऑफिसमधील पाच लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याचा प्रकार स्वारगेट परिसरात शंकर शेठ रस्त्यावर घडला. या प्रकरणी साजी जोसेफ (वय ४७, रा. कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी फिर्याद दिली असून, त्यावरून अज्ञातावर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरशेठ रस्त्यावरील 'अर्चिस कोर्ट' या ठिकाणी 'एस. आर. सी. केमिकल प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीचे ऑफिस आहे. हे ऑफिस १८ डिसेंबरला सायंकाळी पावणेसात वाजता नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता ऑफिस उघडण्यात आले. त्यावेळी ऑफिसमध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. यामध्ये ऑफिसमधील लाकडी टेबलच्या 'ड्रॉवर'चे कुलूप तोडून पाच लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरली. खडक पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक वैभव पवार अधिक तपास करत आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/jHDcjQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬