[pune] - ‘पेव्हर ब्लॉक’ मारूनवकिलाला केले जखमी

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गाडी हळू चालवत असल्याच्या कारणावरून वकिलाच्या दुचाकीला मागून धडक देऊन, त्याच्याशी वाद घालून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी रात्री अकराच्या सुमारास घडला. दुचाकीला धडक देणाऱ्या तिघांनी वकिलाच्या डोक्यात 'पेव्हर ब्लॉक' मारून त्यांना गंभीर जखमी केले.

या प्रकरणी संदिपक फडके (वय ३८, रा. एरंडवणे) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून तिघांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदिपक हे ज्येष्ठ विधिज्ञ नंदू फडके यांचे चिरंजीव आहेत.

डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिपक बुधवारी रात्री अकराच्या सुमारास नवी पेठेतून गरवारे कॉलेजपर्यंत आले. तेथून ते काशीबाई खिलारे रस्त्याकडे (खिलारे वस्ती) वळाले. त्या वेळी मागून दुचाकीवरून तिघे येत होते. त्या वेळी समोरील हातगाडीवरील ड्रम खाली पडल्याने फडके यांनी ब्रेक लावला. दरम्यान, मागून आलेली दुचाकी फडके यांना येऊन धडकली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/0_nOVAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬