[pune] - मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार

  |   Punenews

पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांतील टपाल कर्मचारी संपावर

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

देशभरातील सर्वंच क्षेत्रातील कामगारांचा मोदी सरकारने व केंद्रीय संचार मंत्री मनोज सिन्हा यांनी अपेक्षाभंग केला आहे. सरकारने वेळोवेळी कामगारांना दिलेली कोणतीही आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे पोस्ट कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत या फसव्या सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार आणि बेमुदत काम बंद करण्याचे आवाहन 'नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक' पुणे विभागाने केले आहे.

अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक कर्मचारी संघटना तसेच नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक या राष्ट्रीय संघटनांच्या नेतृत्वाखाली देशातील दोन लाख सत्तर हजार टपाल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांतील टपाल कर्मचारी संपावर गेले आहेत. संघटनेचे सचिव राजू करपे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड स्टेशन येथे हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी टपाल कर्मचाऱ्यांना मे २०१८ मध्ये सलग सोळा दिवसांचा संप केला होता. त्या वेळी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच 'कमलेश चंद्रा कमिटी'च्या शिफारशी लागू करण्याचाही शब्द दिला होता. परंतु सरकारला मागील सहा महिन्यांत दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. 'कुंभकर्णाची' झोप घेतलेल्या व देशभरातील टपाल कर्मचाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी व कामगारांच्या न्याय्य हक्क व मागण्या मान्य करण्यासाठी बेमुदत संपाशिवाय पर्याय नाही, असे करपे यांनी सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1Z5uQwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬