[pune] - यांत्रिकी कार्यालयाच्या‘उद्योगां’ना अखेर चाप

  |   Punenews

भाड्याने यंत्रे घेण्यावर घातले निर्बंध

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरकारी मालकीची यंत्रे उपलब्ध असतानाही भाडेतत्त्वावर नवी यंत्रे मागविण्याच्या जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी कार्यालयाच्या उद्योगांना राज्य सरकारनेच चाप लावला आहे. या संदर्भात जलसंपदा विभागाच्या सचिवांनी परिपत्रक जारी करून कोणत्याही कामासाठी भाडेतत्त्वावर यंत्रे घेण्यास निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सरकारी मालकीची यंत्रे धूळ खात पडली असतानाही भाड्याने यंत्रे मागवून ठेकेदारांचे भले करण्याच्या उद्योगांना आळा बसेल आणि जनतेच्या कररूपी पैशांची उधळपट्टी थांबेल, अशी अपेक्षा स्वयंसेवी संस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

जलसंपदेच्या (यांत्रिकी) पुणे कार्यालयाने जुलै महिन्यात दोन कालव्यातून गाळ काढण्यासाठी उत्खनन यंत्रे, डंपर्स, लोडर्स भाड्याने घेण्यासाठी ४२ लाख रुपयांच्या निविदा काढल्या होत्या. मात्र, विभागाच्या विविध कार्यालयांकडे ही यंत्रे विनावापर पडून आहेत. त्यांचा वापर करून गाळ काढण्याऐवजी यांत्रिकी कार्यालयाने भाडेतत्त्वावर यंत्रे मागविण्याचा घाट घातल्याचा प्रकार 'सजग नागरिक मंचा'ने उघडकीस आणला होता. या निविदा रद्द करून उपलब्ध यंत्राचाच वापर गाळ काढण्यासाठी करावा, तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मंचाचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी जलसंपदा खात्याच्या प्रधान सचिवांकडे केली होती. त्याची दखल घेऊन सचिवांनी निर्देश जारी करत कोणत्याही कामासाठी भाड्याने यंत्रे घेऊ नयेत, त्याऐवजी खात्यांतर्गत उपलब्ध यंत्रांचा वापर करावा, असे बजावले आहे. त्यामुळे या कामांसाठीच्या निविदा रद्द झाल्या आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/SSsVaQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬