[pune] - ‘स्काउट-गाइड’ व‘एनसीसी’साठी गुण

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेत यंदा पहिल्यांदाच राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) विद्यार्थ्यांना १० ते २० अतिरिक्त गुण, तर स्काउट व गाइडच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती पदक मिळवल्यास किंवा जंबोरी शिबिरात सहभाग घेतल्यास १० गुण मिळणार आहे. नव्या धोरणानुसार, दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांची सवलत ३ ते २५ गुणांपर्यंत मिळणार आहे.

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने गुरुवारी याबाबतचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कला व क्रीडा कोट्यातून अतिरिक्त गुण देण्यात येतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हा ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला व क्रीडा प्रकारांत प्रावीण्य मिळालेले असण्याची गरज आहे. यंदा प्रथमच एनसीसी, स्काउट व गाइडच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रावीण्यानुसार गुण देण्यात येणार आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/_37kVAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬