[thane] - एसटी महामंडळाच्या भूखंडावर पार्किंग

  |   Thanenews

चालकांकडून बेकायदा वसुली

म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ

अंबरनाथ शहरातील नगरपालिकेचे भूखंड गिळंकृत करण्याचे प्रकार घडत असताना, आता अंबरनाथ पश्चिम भागातील एसटी महामंडळाच्या मोक्याच्या जागेवर एका व्यक्तीने अनधिकृत वाहनतळ सुरू केले आहे. विशेष म्हणजे, एसटी महामंडळाचेच पावती पुस्तक वापरत हा कंत्राटदार दुचाकी वाहनचालकांकडून बेकायदा पार्किंगची वसुली करत असल्याचा प्रकार समोर येत आहे.

अंबरनाथ स्थानक परिसरातील पूर्व आणि पश्चिम भागात दुचाकींच्या पार्किंगचा प्रश्न गंभीर होत आहे. नगरपालिकेकडून स्थानक परिसरातील काही मोकळ्या भूखंडावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पार्किंगच्या जागेचे महत्त्व लक्षात घेता, शहरातील पश्चिम भागातील रेल्वे स्थानकाला लागूनच एसटी महामंडळाचा मोक्याचा भूखंड आहे. पूर्वी या एसटी डेपोतून सुटणाऱ्या एसटीसेवा बंद झाल्याने या भूखंडाच्या चारही बाजूंनी अतिक्रमण वाढले आहे. त्यात मोकळ्या भूखंडाचा वापर पार्किंगसाठी सुरू करण्यात आला होता. या पूर्वी एसटी महामंडळाने नेमलेल्या कंत्राटदाराचे कंत्राट चार महिन्यांपूर्वीच रद्द झाले. त्यामुळे ही जागा त्याच अवस्थेत पडून होती. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कुमार नावाच्या व्यक्तीने या ठिकाणी कुठलीही निविदा प्रक्रिया न राबवता एसटी महामंडळाच्या भूखंडावर बेकायदा पार्किंग सुरू केली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/36klagAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬