[thane] - परनाळीमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, पालघर

तारापूरजवळील परनाळी गावामधील सर्व्हे क्र. ५४/१ व ५५/५ मधील आदिवासी जमिनीवरील अनधिकृत बांधकामे गुरुवारी महसूल विभागाने निष्कासित केली. या कारवाईदरम्यान काहींनी विरोध केला. मात्र यावेळी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.

जयेंद्र दुबळा यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे १९ एप्रिल २०१७ रोजी अर्ज केला होता, त्या अनुषंगाने सुनावणी घेऊन बांधकाम निष्कासित करण्याचे आदेश आधी देण्यात आले होते. दरम्यान या दावा प्रकरणातील प्रतिवादींनी पालघरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून तात्पुरता स्थगिती आदेश मिळवला होता. अखेर हा आदेश संपुष्टात आल्यानंतर पालघरचे तहसीलदार महेश सागर यांनी २६ नोव्हेंबर २०१८ला बे बांधकाम निष्कासित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नऊजणांनी चाळ व घरे बांधलेली १६ बांधकामे गुरुवारी जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/YhMVTgAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬