[thane] - बचतगट भवन कंत्राटदाराला आंदण

  |   Thanenews

चौकशीचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे

रेडी रेकनरनुसार भाड्याची सक्ती केल्यामुळे गेल्या १० वर्षांपासून लोकमान्यनगर येथील महिला बचतगट भवनाची वास्तू ओस पडून आहे. मात्र, कोणताही मोबदला न घेता ही वास्तू ठाण्यातील सायकल प्रकल्पाच्या कंत्राटदाराला आंदण देण्यात आल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उघड झाली आहे. बेकायदा पद्धतीने वास्तू देण्याच्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप आणि सेनेच्या नगरसेवकांनी केल्यानंतर त्याबाबतची छाननी करून अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी दिले आहेत.

महिला बचतगटांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण, महिला बचतगटांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि एकूणच बचतगटांचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने लोकमान्यनगर येथे महापालिकेने महिला बचतगट भवनाची वास्तू उभी केली होती. १० वर्षांपूर्वी शिवेसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते त्याचे उद्घाटन झाले. मात्र, पालिकेने सरकारी नियमांवर बोट ठेवत रेडी रेकनरच्या दरानुसार भाडे आकारणीचे धोरण निश्चित केले. एवढे भाडे देणे कोणत्याही बचतगटांना शक्य नसल्याने ही वास्तू गेली १० वर्षे ओस पडून आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी ठाणे शहरात सायकल प्रकल्प राबविणाऱ्या कंत्राटदाराला ही वास्तू कोणत्याही मोबदल्याशिवाय देण्यात आली आहे. त्याबाबत भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी लेखी प्रश्न विचारले होते. त्यामुद्द्यावरून पालिकेच्या सभेत गुरुवारी गोंधळ झाला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/h7EFSQAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬