[thane] - मुलींच्या स्वागतासाठी …जिल्हा रुग्णालयाचा प्रयत्न

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

मुलींचा जन्म नाकारणाऱ्या बुरसटलेल्या विचारसरणींच्या लोकांमध्ये बदल व्हावा, मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे तसेच मुलींचा सन्मान वाढावा यासाठी नव्या वर्षापासून जिल्हा रुग्णालयात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीचे स्वागत ड्रेस देऊन करणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचा प्रयत्न ठाण्यात केला जाणार आहे.

एक हजार मुलांमागे ९५० मुली हा जन्मदर समाजाच्या स्वास्थ्याच्या आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो. मुलगा हवा या हट्टापाई ठाण्यासह राज्यात अनेक स्त्री-भ्रूणहत्या झाल्या. त्यामुळे मुलींचा जन्मदर कमी झाला होता. मात्र सोनोगाफी केंद्रावर कारवाई, सरकारी आणि खासगी रुग्णालयामधील समुपदेशन या प्रयत्नातून गेल्यावर्षाच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात वाढ झाली असून प्रतिएक हजार मुलांमागे मुलींचा दर हा ९२७ इतका आहे. २०१६ रोजी ९१५ इतका होता. त्यामुळे पालकांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी काही प्रमाणात प्रशासनाला यश आले असून ठाण्यातील मुलींच्या जन्माचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/etQoRwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬