[thane] - मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या ज्येष्ठास कारावास

  |   Thanenews

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

सार्वजनिक उद्यानात खाऊचे आमिष दाखवून नऊ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकास ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती जी. पी. शिरसाट यांनी हा निर्णय दिला. मुख्य सरकारी वकील संजय लोंढे यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.

नवीमुंबईतील कोपरी परिसरातील तलाव पार्क येथील सार्वजनिक उद्यानात १८ डिसेंबर २०१७ रोजी आरोपी लक्ष्मणप्रसाद मिठूप्रसाद बाकावर बसला होता. त्याच्या शेजारी ९ वर्षीय मुलगीही बसलेली असल्याने बघणाऱ्या लोकांना ती चिमुकली त्यांची नात असल्याचे वाटले. परंतु ही व्यक्ती तिच्याशी अश्लिल चाळे करत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्याला पकडले. त्यावेळी मुलीला खाऊसाठी १० रुपये देतो असे सांगून त्याने तिला उद्यानात आणल्याचे उघड झाले. तर बचाव पक्षाने वयाचे आणि घरातील एकमेव कमवता असल्याचे सांगत सहानुभूतीने विचार करण्याची विनंती केली होती. मात्र, बाललैंगिक शोषण प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा असल्याने आरोपीवर लावण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला यश मिळाले. साक्षीपुराव्याच्या आधारे आरोपी लक्ष्मणप्रसाद याला दोन वर्ष कारावास आणि एक हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आला आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/0DQ8yAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬