[maharashtra] - आनंदवारी: मुख्यमंत्र्यांऐवजी या दाम्पत्याला मिळाला विठ्ठलपूजेचा मान

  |   Maharashtranews

पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर, हिंगोली येथील अनिल आणि वर्षा जाधव या दाम्पत्यानं शासकीय महापूजा केली. राज्यात सुख-शांती नांदो, असं साकडं जाधव दाम्पत्यानं विठ्ठलाला घातलं.

दरम्यान, लाखो वारकऱ्यांमधून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाल्याने जाधव दाम्पत्याने आनंद व्यक्त केला. विठ्ठलपूजा सुरू असताना, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राणा जगजितसिंह पाटील, दिग्विजय सिंह, माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, साधना भोसले, शकुंतला नडगिरे यांच्यासह कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे, पोनि श्रीकांत पाडुळे यांच्यासह मंदिर समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Gt0FEAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬