[maharashtra] - ..तर हुडकून काढू आणि अधिकाऱ्यांचा हिशेब करू: जयंत पाटील

  |   Maharashtranews

सांगली: काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचारात असणाऱ्या लोकांना जर हद्दपार करणार असाल तर, निवडणुकीनंतर हुडकून काढून अधिकाऱ्यांचा हिशेब करु अशी धमकी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

सांगली महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. सांगली महापालिका निवडणुकीत भाजपकडून पोलिस आणि प्रशासनाचा गैरवापर सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचारात असणाऱ्या लोकांनां जर हद्दपार करणार असाल तर, अधिकाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावे, चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे, असतात असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, राज्यभरात निघणारे मराठा मोर्चे आणि होणारी आंदोलने यावरूनही पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. यावेळी बोलताना मराठा समाजाला आश्वासन देऊन, फसवलं म्हणून मुख्यमंत्री पंढरपूरला जाऊ शकत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/e4XVpAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬