[mumbai] - आनंदवारी: विठ्ठलपूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या भावाना ट्विटरद्वारे व्यक्त

  |   Mumbainews

मुंबई: पंढरपूर येथे आषाढी एकादशीला होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय पूजेला उपस्थित न राहण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या तीव्र असलेल्या भावना आणि त्यामुळे विठ्ठलपूजेला असलेला विरोध पाहता मुख्यमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागला. असे असले तरी मुख्यमंत्र्यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी विठ्ठलाची पूजा सपत्नीक केली. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना ट्विटरद्वारे व्यक्त केल्या.

'आज काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपुरात माऊलीचे पूजन करता आले नाही. पण, वर्षा या शासकीय निवासस्थानी सपत्नीक, कुटुंबीयांसह मनोभावे, भक्तीभावे विठोबा-रखुमाईच्या त्याच मूर्तीचे पूजन केले. दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥', अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तर, दुसऱ्या ट्विटमध्ये 'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल...गुरू विठ्ठल, गुरूदेवता विठ्ठल... निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल...', असा अभंगही त्यांनी पोस्ट केला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/VaVdWgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬