[mumbai] - कमळ दाखवणार भुजबळ! अमित शहांकडून भाजप कार्यकर्त्यांना स्वबळाचे आदेश

  |   Mumbainews

मुंबई: स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागा. सत्तेत असल्यानं भ्रमात राहू नका, असे आदेश भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मुंबईत दिले. अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर रविवारी आले होते. त्यावेळी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

दरम्यान, पक्ष कार्यर्त्यांसोबत संवाद साधताना त्यांनी निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिलेत. 'एक बूथ २५ यूथ' अशा पद्धतीची रचना करा, सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, सत्तेत आहोत, म्हणून आपली सगळी कामं होतील, या भ्रमात राहू नका अशा सूचना अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या.

मुंबईमध्ये अमित शाह यांनी संपर्क फॉर समर्थन या मोहिमेअंतर्गत भारतरत्न लता मंगेशकर यांची भेट घेतली. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी, पियूष गोयल आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांशीही अमित शाहांची मुंबईत चर्चा झाली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/EPLhXwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬