[ahmednagar] - ‘ते’ राज्य सांभाळायचे सोडून तालुक्यात खुटखुट करतात

  |   Ahmednagarnews

माजी मंत्री थोरात यांची नाव न घेता विखेंवर टीका

संगमनेर : 'संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागात आपलेच काही लोक रात्रीतून कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोत्या मनाच्या या मोठ्या राजकारण्यांना पक्षाने राज्य सांभाळण्याची संधी दिली, पण ते तालुक्यात खुटखुट करीत बसले आहेत,' अशी टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही, पण त्यांचा रोख विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्याकडे होता.

हंगेवाडी येथे मंगळवारी (२२ जानेवारी) आमदार बाळासाहेब थोरात आणि आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत ऊस उत्पादकांचा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर होते. या वेळी थोरात बोलत होते. गेल्या काही काळपासून विखे व थोरात यांच्यातील संघर्ष टोकदार झाला आहे. विखे यांनी संगमनेर तालुक्यात जाऊन काही कार्यक्रम घेतल्यानंतर हा वाद पेटला असून त्यावर थोरात यांनी या वेळी जाहीर भाष्य केल्याचे दिसून आले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/nW71xgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬