[ahmednagar] - फास्ट न्यूज ५

  |   Ahmednagarnews

भिंगार येथे शरिरसौष्ठव स्पर्धा

नगर : 'प्रजाकसत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीला नगर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन व फिटनेस असोसिएशनच्या वतीने भिंगार येथील खुशबू लॉन येथे शरिरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सहा वजनीगटात होणार आहे. प्रत्येक गटात पहिल्या पाच क्रमांकास रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे,' अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष महेश सातपुते, कार्याध्यक्ष महेश गोसावी यांनी दिली आहे.

माजी सैनिकांचा मेळावा

नगरः माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेने २७ जानेवारी रोजी आजी-माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा नगर-पाथर्डी रोडवरील भिंगार येथील सत्यभामा मंगल कार्यालयात होणार आहे. वीर माता-पिता, वीर पत्नी यांचा प्रमुख आतिथींच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ माजी सैनिकांचा गौरव पुरस्कार देऊन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच २६ जानेवारी होणाऱ्या व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजयी होणाऱ्या संघांना पारितोषिक वितरण केले जाणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/P8t6qgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬