[ahmednagar] - बौद्धीक, सांस्कृतिक व खाद्य संस्कृतीचे प्रदर्शन

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

'भारत भारती या सामाजिक संस्थेच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवार (२६ जानेवारी) रोजी बौद्धीक, सांस्कृतिक व खाद्य संस्कृतीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरकरांसाठी उपक्रम घेण्याचे संस्थेचे हे नववे वर्ष असून यंदाच्या वर्षी संरक्षण खात्याकडून विशिष्ट सेवा मेडल प्राप्त निवृत्त मेजर जनरल एस.पी.सिन्हा यांचे 'नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्य' या विषयावर व्याख्यान होणार आहे. याशिवाय अभिनेते व संस्कार भारती कोकण विभागाचे अध्यक्ष विक्रम गोखले हे 'एक मे अनेक' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत,' अशी माहिती भारत भारतीचे अध्यक्ष दामोदर बठेजा यांनी दिली. हा उपक्रम शनिवारी संजोग लॉन येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.

'गेल्या नऊ वर्षांपासून भारत भारतीच्यावतीने प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून तो भारताच्या जडण-घडणीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या राष्ट्रपुरुषास समर्पित करण्यात येत असतो. यावर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ७५ वी पुण्यतिथी आहे. त्यामुळे यंदाचा कार्यक्रम हा त्यांना अर्पण करण्यात आला असून, त्यांच्या जीवनपटावर मेजर जनरल एस.पी.सिन्हा आपल्या व्याख्यानातून प्रकाश टाकणार आहेत. या कार्यक्रमानिमित्त फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण भारतातील विविध राज्यांचे खाद्य संस्कृतीचे प्रदर्शन यानिमित्त भरवण्यात येणार आहे,' असे संस्थेचे उपाध्यक्ष राजू लक्ष्मण यांनी सांगितले. 'याप्रसंगी सादर होणाऱ्या सांस्कृतीक कार्यक्रमातून सर्व राज्यांच्या संस्कृती व परंपरेचे सादरीकरण नगरमधील विविध राज्यांचे प्रतिनिधी, शाळांचे विद्यार्थी करणार असून नगरकरांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा,' असे आवाहन संस्थेच्या वतीने सचिव समीर बोरा यांनी केले आहे. यावेळी संस्थेचे सल्लागार रामेश्वर बिहाणी, संघटक आनंदसिंग रावत, चेतन जग्गी उपस्थित होते.

फोटो - http://v.duta.us/wiTHCAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/H1UufwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬